नायर रुग्णालयातील कर्मचाऱ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नायर रुग्णालयातील कर्मचाऱ्याची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

Share This

मुंबई - मुंबई महापालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी  मारून एका कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याची घटना समोर आली आहे. रोहित गुरबानी अस मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. (An employee of Nair hospital committed suicide by jumping from the building)(Mumbai News)

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित गुरबानी हा 33 वर्षीय कर्मचारी नायर रुग्णालयात रजिस्ट्रेशन असिस्टंट म्हणून 2015 पासून कामाला होता. मागील सात ते आठ वर्षांपासून त्याच्यावर सिझोफेनिया आजाराचे उपचार सुरू होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्याची नियुक्ती झाली होती. आज 6 मे रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास रुग्णालय कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या टोपाझ या 15 मजली इमारतीच्या गच्चीवर रोहित गेला. त्याने गच्चीवरून उडी मारली. 

रोहितने गच्चीवरून उडी मारल्यावर त्याला साडेपाचच्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्याला तपासले असता रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आग्रिपाडा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे. दरम्यान रोहितने आत्महत्या का केली हे समजू शकलेले नाही. ही घटना घडली तेव्हा समोरच्या इमारतीमधून या घटनेचा एक व्हिडिओ बनवण्यात आला असून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages