पत्रकार सांगून खंडणी वसुली, भाजप पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 May 2024

पत्रकार सांगून खंडणी वसुली, भाजप पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल


भाईंंदर - पत्रकार असल्याचे सांगून खंडणी वसुली करणाऱ्या भाजप पदाधिकारी असलेल्या संजय ठाकूर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय ठाकूर असे या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी भाईंदर पोलिस अधिक तपास करत आहेत. (Marathi News)(Mira Bhayandar News)(Case filed against BJP office bearer)

भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्ली, गणेश देवल नगर भागात दिनेश गौतम हा बांधकाम कंत्राटदार एका बांधकामाचे काम मिळाल्याने ते करत होता. जानेवारी महिन्यात गौतम हा बांधकाम करत असताना स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्या भाजप पदाधिकारी संजय ठाकूरने त्याला कॉल करून महापालिकेकडे तक्रार करून बांधकाम तोडण्याची धमकी दिली.

याप्रकरणी नगर भवनजवळ गौतमला बोलावून ठाकूरने त्याच्याकडे ५ हजारांची खंडणी उकळली. २८ एप्रिल रोजी संजयने गौतमकडून आणखी ६ हजार रुपयांची खंडणी वसूल केली. या खंडणी वसुलीत त्याच्यासोबत गितेश दवे हा देखील होता.

या प्रकरणी गौतम यांच्या तक्रारीनंतर ३ मे च्या रात्री भाईंदर पोलिसांनी संजय व दवे या दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी यांच्या मार्गदशनाखाली सहाय्यक निरीक्षक माणिक कतुरे हे तपास करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad