मुलुंड, भांडुप, मानखुर्द, पवईत ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन, वीज पुरवठा बंद ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 May 2024

मुलुंड, भांडुप, मानखुर्द, पवईत ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन, वीज पुरवठा बंद !



मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत आज मतदान सुरु असताना मुलुंड, मानखुर्द, पवई येथे ईव्हीएम मशीन तसेच व्हीव्हीपॅट मशीन बंद पडले होते. तर भांडुप खिंडीपाडा येथे लाईट गेल्याने काही काळ मतदानावर परिणाम झाला. ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट मशीन बदलल्यावर तसेच वीज पुरवठा सुरु केल्यावर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरु झाली. अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे. (Election 2024) (Marathi Latest News) (Mumbai News)

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज दि. २० मे २०२४ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सुरु झाले. पाचव्या टप्प्यातील एकूण १३ मतदारसंघात आज मतदान सुरु झाले. मतदानादरम्यान मुलुंड बूथ क्रमांक १२६ तसेच मानखुर्द येथे व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाला होता. तो तत्काळ दुरुस्त केल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली. पवईतील मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद असल्याने आदेश बांदेकर यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. त्याची दखल घेत निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले. त्यानंतर मतदान सुरळीतपणे सुरू झाले अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली आहे.

भांडुपमध्ये लाईट बंद -
मतदान सुरु असताना भांडुप खिंडीपाडा ओमेगा हायस्कूलमधील वीज पुरवठा बंद झाल्याने मतदान प्रक्रिया अर्धा तास बंद होती. वीज पुरवठा पुन्हा सुरु झाल्यावर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad