मुंबई - मानखुर्दमध्ये रस्त्यावरचा शॉर्मा खाऊन एका युवकाचा मृत्यू झाला असून अनेकांना विषबाधा झाली आहे. या प्रकारानंतर पालिका प्रशासनाला जाग आली असून आज (मंगळवार दिनांक ८ मे २०२४) सायंकाळच्या वेळेत मानखुर्द महाराष्ट्र नगर (Mankhurd Maharashtra Nagar) परिसरात एम पूर्व विभागाच्या अतिक्रमण विभागामार्फत १५ फेरीवाल्यांवर कार्यवाही करण्यात आली.(Mumbai News) (campaign against hawkers in Mankhurd)
एम पूर्व विभागातील मानखुर्दमध्ये महाराष्ट्र नगर येथे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात नियमित कार्यवाही करण्यात येते. याच कारवाईचा भाग म्हणून काल (मंगळवार दिनांक ८ मे २०२४) सायंकाळच्या वेळेत या परिसरात एम पूर्व विभागाच्या अतिक्रमण विभागामार्फत मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत एकूण १५ फेरीवाल्यांवर कार्यवाही करण्यात आली.
या कार्यवाहीअंतर्गत भाजीपाला, फेरीवाल्यांचे बाकडे आणि स्टॅण्ड असे साहित्य जप्त करण्यात आले. ही कार्यवाही महानगरपालिकेच्या कर्मचारी वर्गाच्या मदतीने व स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने करण्यात आली. या कार्यवाहीसाठी २ पोलीस कर्मचारी तसेच महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वरिष्ठ निरीक्षकांसह आठ कामगारांचा आणि वैद्यकीय आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.
कार्यवाहीनंतर हा परिसर फेरीवालामुक्त करण्यात आला. याआधीही एम पूर्व विभागाच्या माध्यमातून या परिसरात सातत्याने कार्यवाही करण्यात आली होती. काही नागरिकांनी या परिसरातील अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर पुन्हा याठिकाणी कार्यवाही करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment