मानखुर्दमध्ये रस्त्यावरचा शॉर्मा खाऊन एकाचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 May 2024

मानखुर्दमध्ये रस्त्यावरचा शॉर्मा खाऊन एकाचा मृत्यू


मुंबई - गोरेगाव येथे चिकन शॉर्मा खाल्याने तीन जणांना विषबाधा (Shawarma Food Poison) झाली होती. ही घटना ताजी असतानाच मानखुर्द येथे रस्त्यावरचा शॉर्मा खाऊन अनेकांना विषबाधा (Mankhurd Shawarma Food Poison) झालीय. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यामुळे रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या शॉर्मा
विक्रेत्यांवर पालिकेचे (Mumbai BMC) आणि आरोग्य विभागाचे (Health Department) नियंत्रण राहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मानखुर्दमध्ये एकाचा मृत्यू - 
मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे खाद्य पदार्थ विक्री होत आहे. यातीलच आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रेजा शेख यांच्या शॉर्मा विक्रीच्या गाडीवरून प्रथमेशसह विभागातील अनेकांनी शॉर्मा खाल्ला होता. यामुळे प्रथमेशला मोठ्या प्रमाणात उलटी आणि पोट दुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याला केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याच दरम्यान महाराष्ट्र नगरमध्ये याच गाडीवरुन शॉर्मा खाल्ल्याने त्रास होणाऱ्यांच्या तक्रारी येऊ लागल्या. वेगवेगळ्या ठिकाणी दहा ते बारा जणांनी उपचारासाठी धावही घेतली. मात्र आज सकाळी उपचार सुरु असताना प्रथमेशची तब्येत खालावली आणि त्याचा मृत्यू झाला. तर इतर चार जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी रस्त्यावर निकृष्ट शॉर्मा बनवून विकणाऱ्या आनंद कांबळे आणि मोहम्मद अहमद रेजा शेख या दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. मुंबईच्या रस्त्यावर असे निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ मोठ्या प्रमाणात बनवून त्याची विक्री केली जाते. यावर पालिकेचे नियत्रणं राहिलेले नाही. यामुळे एक तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

गोरेगावमध्ये 12 जणांना विषबाधा -
गोरेगाव पूर्व संतोष नगर येथील स्याटेलाईट टॉवर फेज 3 येथे 26 एप्रिल रोजी रात्री 11 च्या सुमारास चिकन शोर्मा खाल्याने 10 जणांना विषबाधा झाली. या सर्वांना एम डब्ल्यू देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. 27 एप्रिल रोजी आणखी 2 जणांना एम डब्ल्यू देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. चिकन शोर्मा खाल्याने दोन दिवसात 12 जणांना विषबाधा (Goregaon Shawarma Food Poison) झाली. या सर्वांवर उपचार केल्यावर 9 जणांची प्रकृती स्थिर असल्याने आज 28 एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर इतर 3 जण रुग्णालयात उपचार घेत होते. स्वप्नील डहाणूकर, मुश्ताक अहमद, सुजित जैस्वाल अशी उपचार घेत असलेल्या रुग्णांची नावे आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages