भांडुपमधून ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना अटक, सुनील राऊत संतापले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भांडुपमधून ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना अटक, सुनील राऊत संतापले

Share This


मुंबई - मुंबईत आज लोकसभेसाठी मतदान सुरु होते. या दरम्यान भांडुपमध्ये डमी मशिनचं प्रात्यक्षिक दाखवणाऱ्या ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. (Marathi Latest News) (Mumbai News)

आमची भूमिका ठाम आहे. ईशान्य मुंबईच्या जनतेने ठरवले आहे संजय दिना पाटलांना दिल्लीला पाठवणार आहे. भारतीय जनता पक्ष आम्हाला प्रचंड त्रास आहे. कालपासून जास्त त्रास देत आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणला जात आहे. आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवले जात आहे. आमच्यावर दबाव आणला जात आहे. त्यांना धमकी दिली आहे. आज सकाळी सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे कार्यकर्ते मतदान केंद्रापासून १०० मीटरच्या बाहेर मतदारांना मतदान कसं करावं हे कळावं म्हणून डमी मशीन घेऊन प्रात्यक्षिक दाखवत होते. त्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे सरकारकडून दबावतंत्र वापरले जात असल्याची प्रतिक्रिया सुनील राऊत यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages