‘जेएनयू’मध्ये मलेरियावरील लस विकसित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 May 2024

‘जेएनयू’मध्ये मलेरियावरील लस विकसितनवी दिल्ली - जगभरात मलेरियामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. हा एक गंभीर आजार आहे. डासांमार्फत होणा-या या आजारावर वेळीच उपचार नाही केले तर रूग्णाला मृत्यू येऊ शकतो. परंतु, या मलेरियावर नुकतीच एक लस शोधण्यात आली आहे.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या पथकाने ही मलेरियावरील लस विकसित केली आहे. ही लस मलेरियाविरूद्ध अधिक प्रभावी आणि आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

सेल प्रेसच्या ‘आयसायन्स’ या नियतकालिकामध्ये या विषयीचे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. त्यांचे हे संशोधन लस विकसित करण्यासाठी परजीवी प्रोहायबिटिन प्रोटिनचे एक नवीन लक्ष्य म्हणून समोर आले आहे. मलेरिया हा आजार मादी अ‍ॅनोफिलीस डासाद्वारे पसरणारा एक वेक्टर-जनित रोग आहे.

या आजाराने आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेतला आहे. या आजारावर आतापर्यंत सतत संशोधन आणि प्रयत्न करण्यात आले आहे, तरी देखील जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२२ च्या अहवालात जगभरात २४९ दशलक्ष प्रकरणे आणि ६० हजार ८०० मृत्यूंसह एक भीषण चित्र समोर आले आहे.

‘जेएनयू’ पथकाने नेमके काय केले? -
स्पेशल सेंटर फॉर मॉलिक्यूलर मेडिसिनच्या जेएनयूमधील प्राध्यापिका शैलजा सिंह आणि प्राध्यापक आनंद रंगनाथन यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या या संशोधनात एक नवीन होस्ट-परजीवी इंटरॅक्टिंग कॉम्प्लेक्स ओळखले आहे. जे एक यशस्वी लस धोरण अनलॉक करण्याची एक महत्वाची गुरूकिल्ली ठरू शकते.

दरम्यान, या संदर्भात बोलताना प्राध्यापिका शैलजा सिंह म्हणाल्या की, आमच्या संशोधनात आम्ही एक नवीन PHB2-Hsp70A1A रिसेप्टर लिगँड जोडी ओळखली आहे. ही जोडी परजीवीला मानवी शरीराच्या आत संसर्ग होण्यास मदत करते. यावर आता परजीवी प्रोटिन PHB2 एक ताकदवान लस म्हणून काम करू शकते.

दरम्यान संशोधकांनी हे शोधून काढले आहे की, मेरोजोइटच्या पृष्ठभागावर आढळून येणारे PfPHB2 प्रोटिन लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावरील हीट-शॉक प्रोटिन Hsp70A1A सोबत क्रिया करते. विशेष म्हणजे या अ‍ॅँटीबॉडी उपचारांमुळे यामध्ये व्यत्यय निर्माण झाला, ज्यामुळे परजीवीची वाढ पूर्णपणे थांबली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad