Mega Block - ठाणे स्थानकावर 62 तासांचा ब्लॉक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 May 2024

Mega Block - ठाणे स्थानकावर 62 तासांचा ब्लॉक


ठाणे - मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावर 62 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक 30 मे रोजी रात्री पासून हा ब्लॉक सुरू होईल. डाऊन फास्ट लाईन साठी 62 तासांचा तर, अप स्लो लाईनवर 12 तासांचा हा ब्लॉक असणार आहे. (Thane Mega Block)

ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 ची रुंदी वाढवण्याच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 5 आणि 6 सर्वात बिझी प्लॅटफॉर्म आहे. या फलाटाची जर रुंदी वाढवली तर जास्त प्रवासी त्या ठिकाणी उभे राहू शकतील. प्रयत्न असा आहे की, दोन्ही ब्लॉक एकच वेळी घेण्यात यावा, कारण प्रवाशांना एकदाच त्रास होईल, सीएसएमटी येथील ब्लॉक आधीच निश्चित आहे, त्यानंतर आता ठाणे स्थानकावरील ब्लॉकही निश्चित करण्यात आला असून गुरुवारी रात्रीपासूनच हा ब्लॉक सुरु होईल.

ठाणे आणि सीएसएमटी स्थानकातील ब्लॉकमुळे अनेक लोकल आणि एक्सप्रेस रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे या विकेंडसाठी जर गरज नसेल, तर प्रवास करू नका. यावेळी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल मोठ्या प्रमाणात रद्द असणार आहेत, परिणामी प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रेल्वेने आसपासच्या महापालिका आणि प्रशासनाला जास्तीत जास्त बस सेवा चालवण्याचं आवाहन केलं आहे, ज्यामुळे प्रवाशांची सोय होईल.

किती गाड्या रद्द होणार?
शुक्रवारी, 31 मे रोजी 4 लांब पल्ल्याच्या गाड्या आणि 187 लोकल रद्द असणार
शनिवारी, 1 जून रोजी, 37 लांब पल्ल्याच्या आणि 534 लोकल रद्द असणार
रविवारी, 2 जून रोजी, 31 मेल एक्सप्रेस आणि 235 लोकल रद्द असणार

शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या
शुक्रवारी, 31 मे रोजी, 11 लांब पल्ल्याच्या तर 12 लोकल
शनिवारी, 1 जून रोजी, मेल एक्सप्रेस तर 326 लोकल
रविवारी, 2 जून रोजी, 18 मेल एक्सप्रेस आणि 114 लोकल

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad