एम पूर्व व एम पश्चिम विभागात २९, ३० मे रोजी पाणीपुरवठा बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 May 2024

एम पूर्व व एम पश्चिम विभागात २९, ३० मे रोजी पाणीपुरवठा बंद

 

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बुधवार, दिनांक २९ मे २०२४ ते गुरुवार, ३० मे २०२४ दरम्यान बी. डी. पाटील मार्ग, वाशी नाका येथे ४५० मिलीमीटर व ७५० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनी जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे एम पूर्व (M East) आणि एम पश्चिम (M West) विभागातील काही भागांना बुधवार, दिनांक २९ मे २०२४  रोजी सकाळी १०.०० वाजेपासून गुरुवार, दिनांक ३० मे २०२४ सकाळी १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद (water cut) राहणार आहे.

या विभागात पाणीपुरवठा बंद -
१) एम पूर्व विभाग (बीट क्रमांक १४७ ते १४८) – लक्ष्मी वसाहत, राणे चाळ, नित्यानंद बाग, तोलाराम वसाहत, श्रीराम नगर, जे. जे. वाडी, शेठ हाइट्स, डोंगरे पार्क, टाटा वसाहत, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बी. पी. सी. एल.) वसाहत, एच. पी. सी. एल. वसाहत, गवाणपाडा, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एच. पी. सी. एल.) रिफायनरी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, टाटा पॉवर थर्मल प्लांट, बी. ए. आर. सी., वरुण बेवरेजेस (बुधवार, दिनांक २९.०५.२०२४  रोजी सकाळी १०.०० ते गुरुवार, दिनांक ३०.०५.२०२४ सकाळी १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील).

२) एम पश्चिम विभाग (बीट क्रमांक १५४ ते १५५) - माहुलगाव, आंबापाडा, जिजामाता नगर, वाशी नाका मैसूर वसाहत, खाडी मशीन, आर. सी. मार्ग, शहाजी नगर, कलेक्टर वसाहत, सिंधी वसाहत, लालडोंगर, सुभाषचंद्र बोस नगर, नवजीवन सोसायटी, ओल्ड बराक चेंबूर छावणी (बुधवार, दिनांक २९.०५.२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून गुरुवार, दिनांक ३०.०५.२०२४ सकाळी १०.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील).

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्‍याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad