मुंबई - धारावी येथील एका व्यावसायिक गाळ्याला आज सकाळी आग लागली. या आगीमध्ये 6 जण जखमी झाले आहेत. या सर्वांना मुंबई पालिकेच्या सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशसानाकडून देण्यात आली आहे. (Fire in Dharavi)(Mumbai News)
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धारावी काळा किल्ला येथील अशोक मिल कंपाऊंड एका चार मजली व्यावसायिक गाळ्याळा आज 28 मे रोजी पहाटे सर्व झोपेत असताना चारच्या सुमारास आग लागली. या आगीत गारमेंटमधील सामान, इलेक्ट्रिक वायरिंग, मशीन, फर्निचर, लाकडी सामान जळून खाक झाले.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. या आगीमधून 6 जणांना बाहेर काढून जवळच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीमुळे 6 पैकी 5 जण 10 ते 50 टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एकाच्या हाताला लागले आहे. त्याच्यावर उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जखमींची माहिती -
1. सलमान खान, 26 वर्ष, 8 to 10 % भाजला
2. मनोज, 26 वर्ष, 8 to 10 % भाजला
3. अमजद, 22 वर्ष, 40 to 45 % भाजला
4. सल्लालुद्दीन,28 वर्ष, 40 to 50 % भाजला
5. सैदुल रेहमान, 26 वर्ष, 35 to 40 % भाजला.
6. रफिक अहमद, 26 वर्ष, हाताला मार लागला असून उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment