यंदा राज्यात ५ टक्के अधिक पाऊस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 June 2024

यंदा राज्यात ५ टक्के अधिक पाऊसपुणे - यंदा राज्यात सरसरीच्या तुलनेत अधिक ५ टक्के पावसाची शक्यता आहे. तसेच र्वा­याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि कमी तापमान याचा परिणाम म्हणून जून आणि जुलै महिन्यात धुळे, राहुरी, अकोला, पाडेगाव, पुणे, कोल्हापूर येथे पावसात खंड राहण्याची शक्यता जेष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी पत्रकार परिषदेत वर्तविली आहे.

आगामी दोन दिवसात राज्याच्या विविध भागात वीजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना आणि वादळी र्वा­यासाह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान राज्याच्या काही भागात दाखल झालेल्या मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल वातावरण असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान यंदा राज्यात सरासरी ९९ टक्के पावसाचा अंदाज असून औगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहील असे हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीतील पावसाचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. दक्षिण कोकण ,उत्तर कोकण,दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्र या भागात दमदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे तर बहुतांशी भागात मध्यम ते तुरळक स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

साबळे म्हणाले यंदा राज्यात सरसरीच्या तुलनेत अधिक ५ टक्के पावसाची शक्यता आहे. तसेच र्वा­याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि कमी तापमान याचा परिणाम म्हणून जून आणि जुलै महिन्यात धुळे, राहुरी, अकोला, पाडेगाव, पुणे, कोल्हापूर येथे पावसात खंड राहण्याची शक्यता आहे. तसेच दापोली ,नागपुर, निफाड, सोलापूर, जळगाव परभणी येथे पावसाच्या खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही ठिकाणी पावसात मोठे खंड राहण्याची शक्यता आहे.

कोठे कमी कोठे जास्त पाऊस - 
पश्चिम विदर्भ विभागात ९८ टक्के, पूर्व विदर्भ विभागात १०३ टक्के, मध्य विदर्भ विभागात ९८ टक्के, मराठवाडा विभागात ९७ टक्के, कोकण विभागात १०६ टक्के उत्तर महाराष्ट्र ९८ टक्के, पश्चिम महाराष्ट्र ९७ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेली २२ वर्ष पावसाचा अंदाज वर्तविण्यात येतो आहे असे ते म्हणाले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad