सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

Share This

मुंबई - सार्वत्रिक लोकसभा निवडणूक महाराष्ट्रात पाच टप्प्यात घेण्यात आली असून या निवडणुकीची मतमोजणी राज्यातील ४८ मतदार संघात मंगळवारी दि. ४ जून २०२४ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सर्व तयारीनिशी सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत देण्यात आली आहे. 

राज्यातील  ४८ मतदार संघातील मतमोजणी केंद्रावर एकूण १४५०७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण २८९ हॉल मध्ये ४३०९ मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सर्व मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages