मुंबई - आयएएस अधिका-यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मंत्रालयासमोर असलेल्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी घेऊन तीने आपले आयुष्य संपविले आहे. लिपी रस्तोगी ही आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांची मुलगी आहे. (Suicide News)
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांची मुलगी लिपी रस्तोगीने मंत्रालयासमोर असलेल्या इमारतीच्या १० व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार ती एलएलबीचे शिक्षण घेत होती. लिपीचे आईवडील दोघेही आयएएस अधिकारी आहेत. वडील विकास रस्तोगी हे सध्या शिक्षण विभागाचे सचिव आहेत तर आई राधिका रस्तोगी या मुद्रा विभाग सचिव आहेत. घटनास्थळी एक सुसाईड नोट आढळून आली आहे, त्यामध्ये लिपी डिप्रेशनमध्ये असल्याचा उल्लेख आहे. घटनास्थळी सुसाईड नोट देखील सापडली आहे. तीने आत्महत्या का केली? याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
No comments:
Post a Comment