मुंबई - मुंबईमध्ये रविवारी रात्रीपासून पाऊस पडत होता. पाऊस पडत असतानाच रविवार आणि सोमवारच्या मध्यरात्री घाटकोपर येथे एका बसचा अपघात झाला आहे. यात दोघे जण जखमी झाले आहेत. दोघांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. (Best Bus Accident) (Mumbai News)
बेस्टची ५३३ क्रमांकाची बस सोमवारी (१० जून) मध्यरात्री १.३० वाजता घाटकोपर डेपोकडे जात होती. ही बस कोटक महेंद्र बॅंकेजवळ अली असता रस्ता दुभाजकावर जाऊन धडकली. यावेळी बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी नसल्याने अनर्थ टळला. बसच्या अपघातात छातीला आणि पायाला मार लागल्याने ड्रायव्हर जखमी झाला. तसेच एका प्रवाशाला किरकोळ मार लागला. दोघांना राजावाडी रुग्णालयात नेले असता त्यांच्यावर उपचार केल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment