Mumbai News - मुंबईत पावसाची दमदार हजेरी, दोन जणांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 June 2024

Mumbai News - मुंबईत पावसाची दमदार हजेरी, दोन जणांचा मृत्यू


मुंबई - मुंबईमध्ये रविवारी पावसाला (Mumbai Rain) सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली. रात्री पासून पावसाने जोर धरला होता. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते. पावसामुळे विक्रोळी पार्कसाईट येथे एक बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळला. यात दोन जणांचा मृत्यू (2 Dead) झाला आहे. (Rain Update) (Mumbai News) 

शहर विभागात सर्वाधिक पाऊस - 
मुंबईत रविवार 9 जून ते 10 जून सकाळी 8 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात शहर विभागात 99.11, पूर्व उपनगरात 61.29 तर पश्चिम उपनगरात 73.78 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज दिवसभर काही वेळ ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

समुद्र किनारी जाऊ नका - 
आज 10 जून रोजी दुपारी 3 वाजता समुद्राला 4.29 मीटरची भरती आहे. 11 जून रोजी मध्यरात्री 2.38 वाजता 3.54 मिटरची भरती आहे. या भरती दरम्यान समुद्रात उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी तसेच पर्यटकांनी समुद्र किनारी जाऊ नये असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  

दोन जणांचा मृत्यू - 
विक्रोळी पार्कसाईट कैलास बिजनेस पार्क येथे एका पाच मजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. रविवारी रात्री पाऊस सुरू असताना रात्री 11.10 वाजता इमारतीचे लोखंडी बिम आणि स्लॅब कोसळला. यात दोघे जण अडकले होते. स्थानिकांनी त्यांना खासगी वाहनातून राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. नागेश रेड्डी 38 वर्षे आणि रोहित रेड्डी 10 वर्षे अशी मृतांची नावे आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad