मुंबई - मुंबई, ठाणे, रायगड येथे रविवारी रात्री जोरदार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला होता. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार मुंबईत रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले. रविवार आणि सोमवारी मध्यरात्री पडलेल्या पावसाने हवेत गारवा पसरला होता. यामुळे गरमीने हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. (Rain Update)(Mumbai Rain) (Water accumulated in low lying areas)
रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत शहर विभागात कमी प्रमाणात पाऊस पडला. याच वेळेत पूर्व उपनगरात विक्रोळी टागोर नगर येथे 82, बिल्डिंग प्रपोजल ऑफिस येथे 69, पवई पालिका शाळा येथे 54, घाटकोपर पंतनगर येथे 43, रमाबाई पालिका शाळा येथे 37, एम पी एस महाराष्ट्र नगर येथे 30, कुर्ला फायर स्टेशन येथे 22 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर पश्चिम उपनगरात मरोल फायर स्टेशन येथे 27, चकाला पालिका शाळा येथे 15 तर बीकेसी फायर स्टेशन येथे 11 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
रात्री 10 ते 11 या कालावधीत शहर विभागात ब्रिटानिया पंपिंग स्टेशन येथे 67, एन एम जोशी मार्ग पालिका शाळा येथे 62, भायखळा फायर स्टेशन येथे 60, मेमनवाडा फायर स्टेशन येथे 56, आय हॉस्पिटल ग्रँट रोड येथे 54 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरात पंतनगर येथे 24, बिल्डिंग प्रपोजल कार्यालय आणि एल वॉर्ड ऑफिस येथे 18 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरात तरे पालिका शाळा येथे 49, दहिसर फायर स्टेशन येथे 33, आर सेंट्रल कार्यालय येथे 20, बीकेसी फायर स्टेशन येथे 18, बांद्रा फायर स्टेशन येथे 15 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
रात्री 11 ते 12 या एक तासात शहर विभागात ब्रिटानिया पंपिंग स्टेशन येथे 77, जी साऊथ वॉर्ड येथे 73, एफ साऊथ वॉर्ड येथे 71, एन एम जोशी पालिका शाळा येथे 70, वरळी फायर स्टेशन येथे 69, बी वॉर्ड येथे 55 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पूर्व उपनगरात वीणा नगर पालिका शाळा येथे 40, मिठा नगर पालिका शाळा येथे 39, मुलुंड फायर स्टेशन येथे 32, पासपोली पवई पालिका शाळा येथे 31, गवाणपाडा फायर स्टेशन येथे 28 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरात एरंगल पालिका शाळा येथे 79, गजधर बांध पंपिंग स्टेशन येथे 59, पाली चिंबाई पालिका शाळा येथे 55, सुपारी टँक पालिका शाळा येथे 54 तर के आणि ई विभाग कार्यालय येथे 54 तर के पूर्व येथे 48 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
No comments:
Post a Comment