मुंबई - मुंबईत शनिवार आणि रविवारच्या (९ आणि १० जून) मध्यरात्री तसेच रविवारी पहाटे काही ठिकाणी पाऊस पडला. यामुळे गरमीने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आज दिवसभर मुंबईत ढगाळ वातावरण राहील तसेच काही ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Rain Update)
मुंबईत ८ जून सकाळी ८ ते ९ जून सकाळी ८ या २४ तासात शहर विभागात ३.९२, पूर्व उपनगरात ७.४४ तर पश्चिम उपनगरात १७.९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात पश्चिम उपनगरात सर्वाधिक पाऊस पडला आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. संध्याकाळी किंवा रात्री काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आज ९ जून रोजी दुपारी २.१७ वाजता ४.४५ मीटर तर १० जून रोजी मध्यरात्री १.५५ वाजता ३.७४ मिटरची भरती असल्याने नागरिकांनी आणि पर्यटकांनी समुद्र किनारी जाऊ नये असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment