Narendra Modi Oath Ceremony - नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 June 2024

Narendra Modi Oath Ceremony - नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली


नवी दिल्ली - देशात तिसऱ्यांदा भाजपप्रणित एनडीएचे (NDA) सरकार सत्तेत आले आहे. नरेंद्र मोदी (Naredra Modi) यांनी आज संध्याकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची (Prime Minister) शपथ घेतली. जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे पहिले नेते आहेत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ५४३ पैकी सर्वाधिक २४० जागा जिंकल्या आहेत. २४० जागा जिंकल्याने भाजपाला २७२ चा बहुमताचा आकडा पार करता आलेला नाही. मात्र भाजपच्या मित्रपक्षांच्या एनडीए आघाडीने २९४ जागा जिंकल्या आहेत. मित्रपक्षांच्या जोरावर बहुमताचा आकडा पार केल्याने नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या बैठकीत नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. बहुमताचा आकडा पार केल्याने एनडीएकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला होता. त्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एनडीएला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात ७१ मंत्री आहेत. त्यात ३० कॅबिनेट मंत्री, ५ राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्य मंत्री आहेत. राष्ट्रपती भवनाच्या परिसरात संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी पाकिस्तान सोडून भारताच्या शेजारी असलेल्या ७ देशातील राष्ट्रप्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad