मुंबई - पवई (Powai) हिरानंदानी (Hiranandani) येथील जयभीम नगर (Jay Bhimnagar) झोपडपट्टीवर तोडक कारवाई करण्यास गेलेल्या पालिका कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक (Stones Pelted) करण्यात आली आहे. या दगडफेकीनंतर पोलिसांनी घराघरात घुसून रहिवाशांना बाहेर काढून लाठीचार्ज केला आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पावसाच्या तोंडावर ही कारवाई केली जात असल्याने आंबेडकरी जनतेने या कारवाईचा निषेध केला आहे.
पवई हिरानंदानी हा परिसर उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखला जातो. याच परिसरात पालिकेच्या जागेवर गेले २५ वर्षे जयभीम नगर ही झोपडपट्टी आहे. पालिकेच्या जागेवर ८०० झोपड्या आहेत. त्या हटवण्यासाठी कोर्टात सुनावणी सुरु होती. येथील रहिवाशांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी २० मे रोजी मतदान केले होते. कोर्टाने २ जून रोजी ही जागा खाली करावी असे आदेश रहिवाशांना दिले आहेत. त्यानंतर ३ जून रोजी पालिकेने याठिकाणी ही जागा पालिकेच्या मालकीची असल्याचा फलक लावला.
आज ६ जून रोजी पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक पोलिसांच्या फौजफाट्यासह तोडक कारवाईसाठी पोहचले असता रहिवाशांनी त्याला विरोध केला. वस्तीच्या सुरुवातीलाच उभे राहून महिलांनी पालिका कर्मचारी आणि पोलिसांनी रोखले. आम्हाला कोर्टात जायला वेळा द्या अशी मागणी रहिवाशांकडून केली जात होती. मात्र पालिका अधिकारी कर्मचारी कारवाईसाठी ठाम होते. यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी पालिका कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक केली. यात ५ ते ६ पोलीस, १ पालिका कर्मचारी आणि २ पत्रकार दगड लागल्याने जखमी झाले आहेत.
रहिवाशांवर लाठीचार्च -
तोडक कारवाई करण्यास गेलेल्या पथकावर दगडफेक केल्यावर पोलीस आणि पालिका कर्मचारी मागे हटले होते. थोडा वेळ परिसरात शांतता पसरली होती. त्यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत घराघरात घुसून रहिवाशांना बाहेर काढून त्यांना काठ्यांनी झोडपून काढले आहे. तसे व्हिडिओ समोर आले आहेत.
बिल्डरच्या दबावाखाली कारवाई -
एका नामवंत बिल्डरच्या दबावाखाली पालिका, पोलिस व राजकारणी सदर झोपड्यांच्या मुळावर उठले आहेत. येथील पुढारी म्हणवणाऱ्या काहींनी बिल्डरशी संगनमत करून लाखो रुपये घेतल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.
एका नामवंत बिल्डरच्या दबावाखाली पालिका, पोलिस व राजकारणी सदर झोपड्यांच्या मुळावर उठले आहेत. येथील पुढारी म्हणवणाऱ्या काहींनी बिल्डरशी संगनमत करून लाखो रुपये घेतल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.
No comments:
Post a Comment