मुंबई - मुंबईत वरळी येथे शिवसेनेच्या उपनेत्याच्या वाहनाने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी असलेला मिहीर शहा अद्याप पोलिसांना मिळालेला नाही. पोलिसांनी त्याला फरार घोषित केले असून त्याच्या विरोधात लूकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे. याप्रकरणी कोणालाही सोडले जाणार नाही अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. दरम्यान राजेश शहा यांना कोर्टात हजर केले असता त्यांची अटक बेकायदेशीर ठरवत त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर शहा यांना जमीन मंजूर झाला आहे.
वरळी अँट्रिया मॉलजवळ येथे रविवारी पहाटे प्रदीप नाखवा व कावेरी नाखवा दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी मागून आलेल्या बीएमडब्ल्यू कारने त्यांना धडक दिली. अपघातामुळे दोघेही कारच्या बॉनेटवर पडले. अपघातादरम्यान प्रदीप नाखवा हे बाजुला झाले तर कर चालकाने कावेरी नाखवा यांना काही अंतर फरफटत नेले. यात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वाहनचालक फरार झाला. अपघातात जप्त केलेल्या वाहनाचे मालक शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांच्यासह ड्राइव्हर राजेंद्र सिंह बिदावत याला अटक केली आहे. तर वाहन चालवणारा मिहीर शहा हा अद्याप फरार आहे. अपघात झाला तेव्हा मिहीर दारू पियाला होता. मिहीरला पकडण्यासाठी पोलिसांनी सहा टीम तयार केल्या असून त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस बजावली आहे.
मुंबईतील ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणे रोखण्यासाठी रस्ते, चौक, वर्दळीची प्रमुख ठिकाणे यासह नाक्या-नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करा. त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पब्ज आणि बारवरही कारवाई करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेसह पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. मद्य सेवन करुन वाहने चालविणाऱ्यांवर कडक कारवाई आणि दंडाची वसूली करा. त्याचबरोबर नियमाचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करा अशा सूचना दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कोणाची कितीही ओळख असली तरी त्याला सोडले जाणार नाही असेही मुख्यमंत्री म्हणाले.
No comments:
Post a Comment