मुंबईला कोणी वाली नाही - अंबादास दानवे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 July 2024

मुंबईला कोणी वाली नाही - अंबादास दानवेमुंबई - मुंबईमध्ये रविवारच्या रात्रीपासून मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे मुंबईमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. यावर आता मुंबईला कोणी वाली राहिलेला नाही अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर केली.
 
मुसळधार पावामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले. रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे रूळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली. पश्चिम रेल्वेही उशिराने धावत असल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. मुसळधार पावसाने मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

मुंबईत अचानक पाऊस आलेला नाही. शहरात पाणी साचल्याने पावसाळ्यापूर्वीची कामी झालेली नाही हे सिद्ध होते. आदित्य ठाकरे जोपर्यंत मंत्री होते, तोपर्यंत मुंबईत बारकाईने लक्ष देत होते. मात्र आता मुंबईला कोणी वाली राहिलेला नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad