लालबागमध्ये सिलेंडर स्फोट, ४ जण जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 July 2024

लालबागमध्ये सिलेंडर स्फोट, ४ जण जखमी


मुंबई - लालबागमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये ४ जण गंभीर जखमी झाले आहे. यामधील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. (Gass Cylinder Blast)   

लालबागच्या डॉ. एस. एस राव रोडवरील मेघवाडी बिल्डिंग क्रमांक ३ मध्ये राणे यांच्या घरामध्ये पहाटे ५ च्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराला आग लागली. यामध्ये घरातील साहित्य, कपडे जळून खाक झाले. या स्फोटामध्ये चौघे जण जखमी झाले आहेत. कुंदा मिलिंद राणे (४८ वर्षे) ही महिला या स्फोटामध्ये ७० ते ८० टक्के जखमी झाली आहे. कुंदा यांची दोन मुलं आणि आणखी एक जण या स्फोटामध्ये जखमी झाले आहेत. अथर्व मिलिंद राणे (१० वर्षे) हा १५ ते २० टक्के जखमी झाला आहे. वैष्णवी मिलिंद राणे (१० वर्षे) ही १५ ते २० टक्के जखमी झाली आहे. तर अनिकेत विलास डिचवलकर (२७ वर्षे) हा तरुण ६० ते ७० टक्के जखमी झाला आहे. यामधील कुंदा राणे आणि त्यांच्या दोन मुलांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अनिकेत डिचवलकरवर मसीना रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. सिलेंडर स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या आगीमध्ये राणे यांच्या घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad