कल्याण डोंबिवलीत पालिकेविरोधात सेल्फी विथ खड्डा उपक्रम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कल्याण डोंबिवलीत पालिकेविरोधात सेल्फी विथ खड्डा उपक्रम

Share This

कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्यावरील खड्ड्यांबाबत मनसेने खड्डे दर्शन स्पर्धा भरवली आहे. तर दुसरीकडे सेल्फी विथ खड्डा असा उपक्रम देखील राबविला आहे. (Selfie with patholes activity)

कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांवरील खड्डे भरण्यास सुरुवात करण्यात आल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात हे काम संथ गतीने सुरू आहे. खड्ड्यांतून प्रवास करताना वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. रस्त्यावरील खड्ड्यांबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेत शहरातील चौका चौकात सेल्फी विथ खड्डा अशा आशयाचे उपहासात्मक बॅनर लावण्यात आले आहेत. मनसेने खड्डे दर्शन स्पर्धा आयोजित केली आहे. शहरात लावण्यात आलेल्या बॅनरच्या माध्यमातून आपल्या परिसरातील खड्ड्यांचे सेल्फी आम्हाला पाठवा आणि आकर्षक बक्षीस जिंका असे आवाहन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे उपलब्ध करून दिल्याबद्दल कल्याण डोंबिवली महापालिकेचे आभार बॅनरद्वारे मानण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages