बीड - देवेंद्र फडणवीस यांचे आरक्षण वाढवण्यासंदर्भातील वक्तव्य हे म्हणजे त्यांचा जावई शोध आहे. एससी एसटी चा आरक्षण वाढवावे हे कोणाच्या बापाच्या हातात नाही. हे स्वतःच्या अंगलट आलेले खेळ आहेत. त्यामुळे तर टोलवाटोलवी करून काहीही उत्तर देत आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीला तुमचे समर्थन आहे की विरोध. विरोध असेल तर विरोध म्हणून सांगा. समर्थन असेल तर समर्थन आहे म्हणून सांगा, पण फाटे कशाला फोडता, असा सवाल आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना केला. आम्ही पहिल्यापासून मागणी करत आहोत ओबीसींचे आरक्षणाचे ताट वेगळे असावे आणि मराठ्यांच्या आरक्षणाचे ताट वेगळे असावे. यात वेगळे काही नाही. आमच्या भूमिकेत बदल नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे. ही यात्रा लातूरवरून आज बीडमध्ये दाखल होत आहे. त्यादरम्यान पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत त्यांचे स्वागत केले. पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आले असताना रोहित पवारांनी प्रकाश आंबेडकरांना सोबत येण्याचे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment