नवी दिल्ली - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मौलानाच्या वेशात तर उपमुख्यमंत्री अजित पवार वेष बदलून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायचे. ओळखपत्र असल्याशिवाय विमानतळावरून सोडत नाहीत. वेष बदलून पवार आणि शिंदे यांनी विमान प्रवास केला. त्यांची कोणतीही चौकशी करण्यात आलेली नाही. विमानतळावर सुरक्षेत त्रुटी राहिल्याचे समोर आल्याने या सर्व प्रकाराची राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली चौकशी करावी अशी मागणी खासदार संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दहशतवाद्यांना प्रेरणा दिली अशी गंभीर टीका त्यांनी केली.
आपण वेष बदलून गृहमंत्री अमित शहा यांना आठ ते दहा वेळा दिल्लीत भेटलो असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. यावर अजित पवार राज्याचे विरोधी पक्ष नेते असताना गृहमंत्र्यांना भेटायचे ही राज्याशी बेईमानी आहे. त्यांनी नाव बदलून बुकिंग केले. वेषांतर करून प्रवास केला. विमानतळावर त्यांचे आधारकार्ड, ओळखपत्र तपासले का नाही. सुरक्षेत त्रुटी राहिल्याने मुंबई, दिल्ली विमानतळ तसेच विमान कंपनीची चौकशी करावी. विमान उड्डाण मंत्र्यांनी चौकशी करून याचा खुलासा करावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. विरोधी पक्ष नेते असताना गृहमंत्र्यांना भेटायला नाव बदलून का जात होते हे योग्य आहे का असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मौलानाच्या वेशात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घ्यायचे, असा खळबजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला. मुख्यमंत्री स्वत:ला आनंद दिघे यांचे शिष्य म्हणवत असले तरी ते दिल्लीला अनेकदा मौलवीच्या वेषात गेलेले आहेत. त्यांना दोन्ही विमानतळावर कोणी रोखत नाही. याचा अर्थ त्यांनी बनावट पॅनकार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड बनवले आहेत. त्यांनी बनावट कागदपत्रे बनवल्याची चौकशी होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमत्र्यांनी प्रवासात बोर्डिंग कार्ड्स, ओळखपत्रे वापरली ती जप्त करून गुन्हा दाखल केला पाहिजे. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. या देशात चीन का घुसला, काश्मीरमध्ये अतिरेकी का घुसत आहेत, याची तालीम एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी दाखवून दिली, असे राऊत म्हणाले.
No comments:
Post a Comment