धरणात 58.13 टक्के पाणीसाठा, पाणीकपात रद्द होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 July 2024

धरणात 58.13 टक्के पाणीसाठा, पाणीकपात रद्द होणार


मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. यामुळे धरणात 58.13 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात असाच पाऊस पडत राहिला तर 70 टक्के पाणीसाठा जमा झाल्यावर 10 टक्के पाणीकपात रद्द केली जाईल. 

मुंबईला मोडक सागर, तानसा, वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणातून पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांना वर्षभर 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष पाण्याची गरज लागते. आज 24 जुलै रोजी सकाळी 6 वाजता सातही धरणात 8 लाख 41 हजार 396 दशलक्ष लिटर म्हणजेच 58.13 टक्के पाणीसाठा जमा झाला. 2023 मध्ये आजच्या दिवशी 52.84 टक्के म्हणजे 7 लाख 64 हजार 741 दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. 2022 मध्ये आजच्या दिवशी धरणात 88.20 टक्के म्हणजेच 12 लाख 76 हजार 563 दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळशी धरण 20 जुलैला भरून वाहू लागले आहे. 

पाणी कपात रद्द होणार -
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पाणीसाठा कमी असल्याने 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. पावसाळ्यात जून आणि जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे धरणात 58 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. हा पाणीसाठा 70 टक्के होताच पाणीकपात रद्द केली जाते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad