अर्जेटिना - एअर्ससुर्याच्या लाव्हेतून निघालेल्या प्लाझमाचा एक झोत किंवा जिव्हा अर्जेटिनाच्या एका अंतराळ छायाचित्रकाराने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून जिव्हा सदृश्य हा झोत पृथ्वी व सुर्याच्यामध्ये असून या जिव्हेची उंची २ लाख ३६ हजार मैल आहे.
अर्जेंटिनाचे अंतराळ छायाचित्रकार इडुरडो स्कॅबर्गर पाऊपिया या ५१ वर्षीय अंतराळ छायाचित्रकाराने या सुर्याच्या प्लाझ्माच्या जिव्हाचे छायाचित्र टिपले आहे. त्यांनी हे छायाचित्र आपल्या एच अल्फा दुर्बिणीतून टिपले आहे. या संदर्भात ते म्हणाले की, काल मध्यरात्री जवळजवळ साडेतीन वाजता वातावरण ढगाळ होते तरी मला हा फोटो काढता आला. प्लाझ्माची ही जिव्हा फारच उंच असून ती पृथ्वी आणि सुर्याच्यामध्ये आहे. दुर्बिणीतून ही जिव्हा पाहणे रोमांचक होते. निसर्गाची ही किमया पाहून मी स्तंभित झालो. इडुरडोने हे छायाचित्र कोरोनडो सोलारमॅक्स ३ सोलार टेलेस्कोपच्या सहाय्याने काढला असून त्यासाठी त्यांनी ६० एमएम अपेचर वापरला होता.
No comments:
Post a Comment