रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव संमत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 July 2024

रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव संमत


मुंबई - विधानसभेत मंत्री दादाजी भुसे यांनी मुंबई शहरातील उपनगरीय रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची केंद्र शासनास शिफारस करणारा ठराव मांडला. हा ठराव सभागृहात संमत करण्यात आला.

ठरावानुसार मुंबई शहरातील मध्य रेल्वे मार्गावरील ‘करी रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘लालबाग’ रेल्वे स्थानक, ‘सॅंडहर्स्ट रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘डोंगरी’ रेल्वे स्थानक, पश्चिम रेल्वे मार्गावरील ‘मरीन लाईन्स’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘मुंबा देवी’ रेल्वे स्थानक, ‘चर्नी रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘गिरगाव’ रेल्वे स्थानक, हार्बर रेल्वे मार्गावरील ‘कॉटन ग्रीन’ चे ‘काळा चौकी’ रेल्वे स्थानक, ‘डॉकयार्ड रोड’ रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘माझगाव’ रेल्वे स्थानक, ‘किंग्ज सर्कल’ स्थानकाचे नाव ‘तीर्थंकर पार्श्वनाथ’ रेल्वे स्थानक करण्याबाबत केंद्र शासनास शिफारस करण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव विधानसभेत संमत करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad