अमेरिकी अंतराळ संस्था ‘नासा’च्या क्यूरियोसिटी रोव्हरला मंगळावर पिवळ्या रंगाचे शुद्ध सल्फरचे क्रिस्टल्स सापडले आहेत. वैज्ञानिक या शोधामुळे आश्चर्यचकित झाले. कारण पाण्याशिवाय या क्रिस्टल्सची निर्मिती अत्यंत अवघड आहे. एक खडकाच्या उघडलेल्या भागात सल्फरचे पिवळे क्रिस्टल्स आढळले आहेत.
क्यूरियोसिटीचे प्रोजेक्ट सायंटिस्ट अश्विन वासवाडा यांनी सांगितले की, या शोधाबद्दल कोणालाही आधी काहीच अंदाज नव्हता. त्यांच्या मते, हे मिशनची सर्वात मोठी उपलब्धी आहे.
३० मे रोजी वासवाडा आणि त्यांच्या टीमने रोव्हरने पाठवलेल्या फोटोंची पाहणी केली. यात दिसत होते की, रोव्हरच्या चाकांच्या मार्गात एक खडक तुटलेला होता. नंतर, झूम करून पाहिल्यावर वैज्ञानिकांना पिवळ्या रंगाचे क्रिस्टल्स दिसले. जेव्हा तपासणी केली तेव्हा हे शुद्ध सल्फर असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर वैज्ञानिक आणखीनच आश्चर्यचकित झाले. वासवाडाच्या मते, सल्फरची खडके सामान्यत: चमकदार आणि क्रिस्टलीन असतात.
वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, मंगळावर सल्फेट असणे सामान्य गोष्ट आहे, पण प्रथमच शुद्ध सल्फर सापडले आहे. कदाचित त्या भागातील खडक सल्फरने भरलेले असू शकतात. पृथ्वीवरही शुद्ध सल्फर अत्यंत दुर्मिळ परिस्थितींमध्ये तयार होते, ज्वालामुखीच्या स्फोटाच्या ठिकाणी शुद्ध सल्फर सापडण्याची शक्यता असते. वासवाडा यांच्या मते, मंगळावर सल्फर सापडणे म्हणजे वाळवंटात पाणी सापडण्यासारखे आहे.
वैज्ञानिक ब-याच काळापासून शोधण्याचा प्रयत्न करत आहेत की, मंगळावर कधी जीवन होते का? सल्फरच्या शोधामुळे या दिशेने मोठी प्रगती होऊ शकते. प्रत्यक्षात सल्फेट्स तेव्हा तयार होतात जेव्हा सल्फर पाण्यात इतर खनिजांसोबत मिसळतो आणि नंतर पाण्याचे बाष्पीभवन होते. यानंतर सल्फेट शिल्लक राहतात. वैज्ञानिकांचा विश्वास आहे की, हा शोध मंगळावर जीवनाच्या रहस्याचा उलगडा करू शकतो. वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की जीवनासाठी सल्फरही आवश्यक आहे आणि लाल ग्रहावर त्याचे अस्तित्व जीवनाचा संकेत देऊ शकते.
No comments:
Post a Comment