मुंबई - महापालिकेच्या आरोग्य सेविका व आशा सेविका यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना १८ जुलै रोजी फोनही केला. त्यानंतर आजपर्यंत पालिका आयुक्तांनी आरोग्य सेविकांना चर्चेसाठी बोलविले नाही. याच्या निषेधार्थ सोमवार २९ जुलै रोजी आरोग्य सेविका सी एच वी व आशा सेविका पूर्ण दिवस काम बंद आंदोलन करून आझाद मैदानात धरणे आंदोलन करतील अशी माहिती महापालिका आरोग्य कर्मचारी संघटनेने दिली. यामुळे मुंबईतील आरोग्य सेवेवर परिणाम होईल.
No comments:
Post a Comment