Mega Block - मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 July 2024

Mega Block - मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

 

मुंबई - अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवार २८ जुलै रोजी मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक घेतला आहे. मुख्य मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत आणि हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी २.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यापुढे माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्याच्या पलीकडे असलेल्या जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

सकाळी १०.५० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. त्यापुढे मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यावर थांबतील आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि १५ मिनिटांनी गंतव्यस्थानावर पोहोचतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल चालविण्यात येतील.

हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉक -
हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असेल. पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.तसेच पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत ठाणे येथे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad