Mumbai Rain - मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Mumbai Rain - मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट

Share This


मुंबई - मुंबई शहर आणि उपनगरांवर मागील काही दिवसांपासून वरुणराजाची कृपा पाहायला मिळत आहे. शहर परिसरात कधी मुसळधार तर कधी संततधार पाऊस कोसळत आहे. अशातच आज पुन्हा एकदा हवामान खात्याकडून मुंबईत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर व उपनगरात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळेल, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच उद्या १६ जुलैसाठी हवामान खात्याकडून मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मान्सूनच्या सुरुवातीला मुंबईला पावसाने ओढ दिली होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच शहर आणि उपनगरांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली. काही दिवसांपूर्वी तर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व शाळांनाही सुट्टी देण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा शहरात मध्यम ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

पाणीसाठा वाढल्याने नागरिकांना दिलासा - 
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ जलाशयांत ४ जुलै रोजी ८.५९ टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून होणा-या दमदार पावसामुळे अवघ्या १० दिवसांत १४ जुलै रोजी पाणीसाठा २९.७३ टक्क्यांवर पोहोचला आहे. मागच्या १० दिवसांत मुंबईच्या पाणीसाठ्यात २१ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागच्या वर्षी १४ जुलै रोजी इतकाच पाणीसाठा उपलब्ध होता. तर १४ जुलै २०२२ रोजी पाणीसाठा तब्बल ६५ टक्के इतका होता. दरम्यान, पाणीसाठ्यातील वाढ दिलासा देणारी असली तरी तूर्तास पालिका प्रशासनाकडून पाणी कपात मागे घेतली जाणार नसल्याने मुंबईकरांना मुबलक पाणी मिळण्यासाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages