मुंबई - ग्रँट रोड रेल्वे स्थानकाजवळील ‘रुबिनीसा’ या चार मजली इमारतीचा भाग शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कोसळला. यात वीरा वाडिया (८०) या महिलेचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. जखमींपैकी तिघांना भाटिया रुग्णालयात, तर एकाला ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल केले.
ग्रँट रोड पश्चिम येथील स्लेटर रोडवरील तळ अधिक चार मजली रुबिनीसा मंझील ही म्हाडाची इमारत आहे. ही इमारत ८० वर्षे जुनी आहे. तिचा काही भाग कोसळला. त्यामुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये घबराट पसरली. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. इमारतीत अडकलेल्या १० ते १२ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून वृद्धेचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अतुल शहा, निकेत शहा, विजयकुमार निशाद, सिद्धेश पालिजा हे जखमी झाले आहेत.
No comments:
Post a Comment