वरिष्ठांना लाजवणारा थाट, सनदी अधिकाऱ्यांची बदली  - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 July 2024

वरिष्ठांना लाजवणारा थाट, सनदी अधिकाऱ्यांची बदली 

 

पुणे - प्रोबेशन कालावधीवर असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही लाजवेल अशी कामे करणाऱ्या सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची अखेर राज्य सरकारने बदली केली आहे. पुणे येथून त्यांची वाशीम येथे बदली करण्यात आली. त्या आता वाशिमच्या जिल्हाधिकारी असतील.

पूजा खेडकर या २०२२ बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांना थाटात राहण्याची सवय आहे. त्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशन कालावधीवर नियुक्त होत्या. त्या नेहमी खासगी ऑडी गाडी घेऊन कार्यलयात येत असत. आपल्या खासगी वाहनावर त्यांनी महाराष्ट्र शासन असा स्टिकर लावला होता. तसेच वाहनावर लाल निळा दिवा लावला होता. त्यामुळे ऑडी गाडीला शासनाचा स्टिकर आणि लाल दिवा लावून कार्यालयात येणारे मोठे अधिकारी कोण याची चर्चा नेहमी जिल्हाधिकारी कार्यालयात व्हायची.

वरिष्ठ अधिकारी शासकीय कामासाठी मुंबईला मंत्रालयात गेले असताना त्यांचे अँटी चेंबर बळकावून खेडकर यांनी वरिष्ठांच्या अँटी चेंबरचे सामान बाहेर काढून तिथे स्वतःचे कार्यालय थाटले. इतकेच नव्हे तर स्वतःच्या नावाचा बोर्डसुद्धा लावला. प्रोबेशनवर असलेल्या अधिकाऱ्यांना गाडी, दालन, शिपाई देण्याची तरतूद नसताना त्या जिल्हाधीकारी यांच्या कार्यालयाच्या बाजूलाच दालन मिळावे, शिपाई मिळावा अशा विविध मागण्या करत होत्या. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे दालन त्यांना परत करण्याच्या सूचना केल्यावर हा आपला अपमान असल्याचे सांगता खेडकर यांनी दालन परत करण्यास नकार दिला.

प्रोबेशनवर असणाऱ्या पूजा खेडकर यांची वर्तणूक प्रशासकीय अधिकाऱ्याला शोभेल अशी नव्हती. जिल्ह्यातील शासकीय कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी त्यांना प्रशिक्षणासाठी जिल्हा बदलून द्यावा असा अहवाल जिल्हाधीकारी सुहास दिवसे यांनी मंत्रालयाकडे दिला होता. या अहवालानंतर पूजा खेडकर यांची बदली करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad