पवई भीम नगरवर झाड कोसळलं - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 July 2024

पवई भीम नगरवर झाड कोसळलं


मुंबई - पावसाच्या तोंडावर पवई येथील जयभीम नगरवर पालिकेने तोडक कारवाई केली आहे. त्यामुळे पावसाळ्यात येथील रहिवाशांना फुटपाथवर राहण्याची वेळ आली आहे. शनिवारी रात्री येथे झाड कोसळल्याने भर पावसात आणखी एक संकट कोसळलं. 

पवई हिरानंदानी जय भीम नगरवर  पालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर तोडक कारवाई केली होती. येथील ८०० झोपड्या पालिकेने मानव हक्क आयोगाच्या आदेशाने तोडल्या आहेत. विशेष म्हणजे पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर दरम्यान तोडक कारवाई करू नये असे न्यायालयाचे आदेश असताना पालिकेने ही कारवाई केली. यामुळे हजारो झोपडीधारक रस्त्यावर आले. 

गेले 40 वर्षे निवडणुकांमध्ये येथील रहिवाशांचे मत घेतले गेले. 2024 च्या लोकसभा निवडणूक निकालाच्या दोनच दिवसात या झोपड्या पाडण्यात आल्या होत्या. येथील रहिवासी फुटपाथवर राहत आहेत. शनिवारी रात्री उपनगरात जोरदार पाऊस पडला. यादरम्यान येथील एक झाड रहिवाशांच्या तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या झोपड्यांवर पडले. यात कोणी जखमी झाले का याची माहिती उपलब्ध झाली नाही. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad