मुंबई महापालिकेचे २ हजार शिक्षक निवडणूक कामावर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 August 2024

मुंबई महापालिकेचे २ हजार शिक्षक निवडणूक कामावर


मुंबई- निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेने आपल्या तब्बल २ हजार शिक्षकांना या निवडणुकीच्या 'ड्युटीवर ' तैनात केले आहे.त्यामुळे या शिक्षकांना तीन दिवस शाळा आणि तीन दिवस निवडणूक असे काम करावे लागत आहे.त्याच परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे.

पालिकेच्या शिक्षकांना असे निवडणुकीचे काम दिल्याने शिक्षकांनी विद्यार्थ्यांंना कसे आणि कधी शिकवायचे ? असा सवाल शिक्षक नेते अनिल बोराळे यांनी केला आहे.महापालिकेच्या इतर विभागात कर्मचारी असताना या निवडणूक कामासाठी फक्त शिक्षकांनाच वेठीस धरले जात आहे.तरी शिक्षकांना दिलेले हे निवडणूक काम त्वरित बंद करावे,अशी मागणीही अनिल बोराळे यांनी केली आहे.सध्या मुंबई महापालिकेचे २ हजार शिक्षक हे आठवड्यातील तीन दिवस निवडणूक काम आणि तीन दिवस शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad