एसटी कामगारांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने वेतन मिळण्यात अजून फक्त सात हजाराची तफावत आहे. राज्य सरकार सवलत मूल्य रक्कम दर महिन्याला वेतनासाठी देत आहे. त्यात अजून फक्त १६० कोटी रुपयांची भर सरकारने टाकली तर वेतनाचा प्रश्न चुटकीसारखा सुटू शकतो.त्याच प्रमाणे महागाई वाढली आहे. व ती दिवसेंदिवस वाढतच आहे. त्या मुळे आमची मागणीही रास्त आहे.एसटी कर्मचाऱ्याची इतर कर्मचाऱ्यांशी तुलना केल्यास एसटी कर्मचारी सेवाभावी वृत्तीने काम करीत आहेत.अमृत महोत्सवी ज्येष्ठ नागरिक,वृध्द, अपंग, दिव्यांग, महिला यांना सरकारने जाहीर केलेल्या सवलती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जीवाचे रान करीत आहेत.किंबहुना सरकारचे दुत आहेत.अश्या कर्मचाऱ्यांशी सुध्दा हितगुज केली पाहिजे. त्यांचे प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. असेही बरगे यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment