लायन्स क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लायन्स क्लबकडून गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Share This

मुंबई - वर्ल्ड वाईड ह्यूमन राइट्स ए. एफ. आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाऊन, लायन्स क्लब्स इंटरनॅशनल (जिल्हा 3231 A1) यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ऑगस्ट २०२४ रोजी जिजामाता नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काळाचौकी येथे मुंबईचे माजी नगरपाल व लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या आणि पेन वाटप करण्यात आले. 

या कार्यक्रमाला ह्यूमन राइट्स संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे,  यांच्या उपस्थितीत फर्स्ट व्हॉइस प्रेसिडेंट लायन जितेंद्र दगडू सकपाळ, अनुराधा हेगडे, शिवसेनेच्या माजी नगरसेविका वैभवी चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. स्थानिक ज्येष्ठ नागरिक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages