आरक्षणाचे वर्गीकरण हे कलम १४ चे उल्लंघन - प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 August 2024

आरक्षणाचे वर्गीकरण हे कलम १४ चे उल्लंघन - प्रकाश आंबेडकर



मुंबई / परभणी - अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. यावर आरक्षणाचे वर्गीकरण हे कलम १४ चे उल्लंघन असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

अनुसूचित जातींमधील विविध जातींच्या मागासलेपणाचे मोजमाप करण्याच्या मापदंडांवर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मौन बाळगले आहे. आरक्षणाचे लाभार्थी हे केवळ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय नसून जनरल कोट्यातील लोकही आहेत. जर फक्त अनुसूचित जाती श्रेणी (ऐतिहासिकदृष्ट्या वंचित) वर्गीकृत केली गेली असेल, तर ते समानतेच्या तत्त्वाचे उल्लंघन करते आणि घटनेच्या कलम १४ अंतर्गत प्रत्येक नागरिकाला न्याय देत नसल्याचे आंबेडकर म्हणाले.

हे ही वाचा - 
SC-ST आरक्षणाचा लाभ 'क्रिमी लेअर' वर्गाला नको - सर्वोच्च न्यायालय
https://www.jpnnews.in/2024/08/apply-creamy-layer-for-sc-st-says-supreme-court.html

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad