ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात सरासरीहून अधिक पाऊस - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात सरासरीहून अधिक पाऊस

Share This

पुणे / मुंबई - हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज जाहीर केला. देशाच्या बहुतांशी भागात या दोन्ही महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील. मात्र ईशान्य आणि शेजारच्या पूर्व भारत, लडाख, सौराष्ट्र आणि कच्छ तसेच मध्य भारताच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

ऑगस्ट महिन्यात देशात सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज आहे. मात्र देशातील अनेक भागात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील, असेही संकेत दिले. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील अनेक भागात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

देशात जून ते जुलै महिन्यात सरासरी पाऊस ४४५.८ नोंदवला जातो. प्रत्यक्षात यंदा ४५३ मिमी पाऊस झाला आहे. १.८ टक्के अधिक पाऊस झाला. तर जून महिन्यात सरासरी १६५ मिमी पाऊस होतो. प्रत्यक्षात १४७ मिमी नोंदवला गेला. १० टक्के पाऊस कमी झाला. तर जुलै महिन्यात सरासरी पाऊस २८० मिमी होतो, प्रत्यक्षात ३०५ मिमी पाऊस झाला असून, ९ टक्के अधिक आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages