नवी दिल्ली - देशात डिजिटल पेमेंटचा (Digital Payments) वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. असे जरी असली तरी याचा आकडा म्हणावा तसा वाढताना दिसत नाही. कारण, आजही सुमारे 60 टक्के ग्राहक, तृतीय श्रेणीतील शहरांपासून ते देशातील लहान शहरांपर्यंत, दररोज डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मचा वापर करत नाहीत. तर दररोज केवळ 40 टक्क्यांहून अधिक ग्राहक डिजिटल पेमेंटचा वापर करतात. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात याबाबतचा दावा करण्यात आला आहे.
भारतातील डिजिटल पेमेंटच्या स्थितीवर प्रसिद्ध झालेल्या ‘चेस इंडिया’च्या अहवालात म्हटले आहे की, देशातील तिसऱ्या ते सहाव्या श्रेणीतील शहरांमधील ग्राहकांकडून सातत्याने डिजिटल पेमेंटचा वापर केला जात असल्याचे दिसून येते. डिजिटल पेमेंट सेवांचा अवलंब करताना जमिनीवर व्यापारी आणि ग्राहकांसमोरील प्रमुख आव्हाने या अहवालाने ओळखली आहेत.
ग्रामीण भारतातील डिजिटल पेमेंटचा वापर न करणाऱ्या जवळपास निम्म्या व्यावसायिकांना या सुविधा किंवा सेवेची माहिती नाही. याउलट, डिजिटल पेमेंट न वापरणारे 94 टक्के ग्राहक हे परिचित असूनही ते वापरत नाहीत. खरेतर, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, मर्यादित ज्ञान, ऑनलाईन पेमेंटवरील अविश्वास आणि सेवेशी संबंधित समस्यांमुळे ग्राहक डिजिटल पेमेंटचा वापर करत नाहीत. अहवालानुसार, सुमारे 41 टक्के व्यापारी डिजिटल पेमेंटद्वारे त्यांच्या विक्रीतील 25 टक्क्यांपेक्षा कमी पैसे मिळवतात, तर सुमारे 15 टक्के व्यापारी डिजिटल पेमेंटद्वारे त्यांच्या 50 टक्क्यांहून अधिक विक्री मिळवतात.
No comments:
Post a Comment