विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ४ टक्क्यांनी वाढल्या, महाराष्ट्र अव्वल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 August 2024

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ४ टक्क्यांनी वाढल्या, महाराष्ट्र अव्वल

मुंबई - भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरवर्षी आत्महत्येचे प्रमाण २ टक्क्यांनी वाढत असू आत्महत्या करणा-या विद्यार्थ्यांच्या संख्येत ४ टक्क्यांनी वाढ होत आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशातील एकूण आत्महत्येच्या १४ टक्के आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. एनसीआरबीच्या अहवालानुसार हे संकट सतत वाढत असल्याचे समोर आलं आहे. 

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या डेटावर आधारित वार्षिक आयसी ३ कॉन्फरन्स आणि एक्स्पो २०२४ मध्ये बुधवारी ‘विद्यार्थी आत्महत्या: भारतात वाढणारी महामारी’ हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. आत्महत्यांच्या घटनांमध्ये दरवर्षी दोन टक्क्यांनी वाढ झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे, तर विद्यार्थी आत्महत्येच्या घटनांमध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या दोन दशकांमध्ये, विद्यार्थी आत्महत्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या दुप्पट, चार टक्क्यांनी चिंताजनक वार्षिक दराने वाढले आहे, असे आयसी ३ संस्थेच्या संलग्न अहवालात म्हटले आहे.

अहवालात २०२२ च्या आकडेवारीची माहिती देण्यात आली आहे. २०२१ च्या तुलनेत (१३,०८९) २०२२ साली १३,०४४ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. दोन्ही वर्षांच्या आकडेवारीत अतिशय किंचितसा फरक आहे. एकूण आत्महत्येची आकडेवारी (विद्यार्थी आणि इतर घटक) यापेक्षा भयानक आहे. २०२१ साली १ लाख ६४ हजार ०३३ आत्महत्या झाल्या होत्या. तर २०२२ साली १ लाख ७० हजार ९२४ आत्महत्यांची नोंद झाली आहे. २०२१ च्या तुलनेत आत्महत्येच्या संख्येत ४.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर मागच्या दोन दशकांची तुलना केल्यास विद्यार्थ्यांच्या आत्महत्या चार टक्क्यांनी वाढल्या आहेत.

सन २०२२ मध्ये एकूण विद्यार्थी आत्महत्यांपैकी ५३ टक्के आत्महत्या मुलांनी केल्या होत्या. २०२१ ते २०२२ दरम्यान, मुलांच्या आत्महत्या सहा टक्क्यांनी कमी झाल्या, तर मुलींच्या आत्महत्या सात टक्क्यांनी वाढल्या. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण लोकसंख्या वाढीचा दर आणि एकूण आत्महत्येचा कल या दोन्हीपेक्षा जास्त आहे. गेल्या दशकात, ०-२४ वयोगटातील लोकसंख्या ५८२ कोटींवरून ५८१ कोटींवर घसरली, तर विद्यार्थी आत्महत्येची संख्या ६,६५४ वरून १३,०४४ वर गेली आहे. मागच्या दशकात मुलांच्या आत्महत्येत ५० टक्क्यांची वाढ झाली असून मुलींच्या आत्महत्यांमध्ये ६१ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागच्या पाच वर्षांत विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या आत्महत्येमध्ये पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. 

आयसी थ्री इंस्टीट्यूटच्या विद्यार्थी आत्महत्येसंदर्भातील अहवालामध्ये भारतामधील महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश ही राज्य आघाडीवर आहेत. या राज्यामध्ये आत्महत्या करणा-या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आहे. देशातील एकूण विद्यार्थी आत्महत्येच्या संख्येच्या एक तृतीयांश आत्महत्या या तीन राज्यांमध्ये होत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. वर्ष २०२१ आणि २०२२ मध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू आणि मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.

१४ टक्के आत्महत्या महाराष्ट्रात -
देशातील विद्यार्थ्यांच्या एकूण आत्महत्येपैकी १४ टक्के आत्महत्या महाराष्ट्रातील विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे ही अतिशय चिंताजनक बाब मानली जात आहे. याशिवाय राजस्थान या बाबतीत दहाव्या क्रमांकावर आहे. राजस्थानमधील कोटा शहरातून अनेकदा विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या येत असतात.

राज्यांची आकडेवारी -
महाराष्ट्र – १,७६४ आत्महत्या (१४ टक्के)

तमिळनाडू – १,४१६ आत्महत्या (११ टक्के)

मध्य प्रदेश – १,३४० आत्महत्या (१० टक्के)

उत्तर प्रदेश – १,०६० आत्महत्या (८ टक्के)

झारखंड – ८२४ आत्महत्या (६ टक्के )

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad