जळगावमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जळगावमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू

Share This

जळगाव - जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून तरुणासह महिलेचा मृत्यू झाला. पहिली घटना मुक्ताईनगर व दुसरी घटना रावेर तालुक्यात घडली. दोन्ही घटना आज (१८ ऑगस्ट) दुपारी शेतात घडल्या. ईश्वर शांताराम सुशिर (२२, रा. पिंप्राळा, ता. मुक्ताईनगर) आणि जुलेखाबी हैदर शा फकीर (३५, रा. शिंगाडी ता. रावेर) अशी मृतांची नावे आहेत.

ईश्वर सुशिर हा पिंप्राळा ता. मुक्ताईनगर शिवारातील स्वतःच्या शेतात आई वडिल, मोठ्या भावासोबत रविवारी खुरपणीसाठी गेला होता. त्यावेळी वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने वडिलांनी मुलाचा मृतदेह पाठिवर घेत सुमारे दोन किलोमीटर पायी चालत आरोग्य केंद्रात आणला. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. तर मलिकाबी ही महिला शेतमजूर महिला शिंगाडी येथील शेतीची कामे आटोपून घराकडे परतत असतानाच तिच्या अंगावर वीज कोसळली. त्यात तिचा मृत्यू झाला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages