नवी दिल्ली - अनुसूचित जाती आणि जमाती अर्थात एससी आणि एसटी आरक्षणातील क्रिमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ देशभरात भारत बंद घोषित करण्यात आला आहे. आरक्षण बचाव संघर्ष समितीने तसंच विविध दलित संघटनांनी आज (२१ ऑगस्ट रोजी) भारत बंदची हाक दिली आहे. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासन अलर्ट मोडवर असून सर्वत्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भारत बंदला देशभरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळू शकतो. या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बंदची हाक असूनही रुग्णालये, मेडिकल, सरकारी कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये आणि पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी, सार्वजनिक वाहतूक, रेल्वे सेवा आणि वीजपुरवठा यासह आपत्कालीन सेवा सुरू राहतील.
बंद दरम्यान अनेक ठिकाणी निदर्शने, रास्तारोको, रेल रोको यासारखे प्रकार घडू शकतात. भारत बंदवेळी कोणताही तणाव किंवा चुकीची घटना घडू नये, यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये पोलीस फौजफाटा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय ? -
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना एससी - एसटी आरक्षणात क्रिमी लेयर बनवण्याची परवानगी दिली आहे. ज्याला खरंच त्याची गरज आहे, त्याला आरक्षणात प्राथमिकता मिळावी. त्यासाठी सब-कॅटेगरी बनवण्याचं कोर्टाने सांगितलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर मोठा वाद निर्माण झाला. हा निर्णय न्यायालयाने मागे घेण्याच्या मागणीसाठी आज (२१ ऑगस्ट) भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment