ठाकरेंच्या गाडीवर शेण, बांगड्या, टोमॅटो फेकले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ठाकरेंच्या गाडीवर शेण, बांगड्या, टोमॅटो फेकले

Share This


मुंबई - ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी शेण फेकले. उद्धव ठाकरे यांचा आज ठाण्यात भगवा सप्ताह मेळावा आयोजित केला होता. मेळाव्यापूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कारवर हल्ला केला. एक दिवसापूर्वीच शिवसैनिकांनी बीडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपा-या फेकल्या होत्या. त्यानंतर मनसेने थेट उद्धव ठाकरेंच्या गाडीवर शेण फेकले. तसेच ठाकरेंच्या ताफ्यावर बांगड्या आणि टोमॅटोही फेकण्यात आले. तसेच फुगेही मारण्यात आले.

उद्धव ठाकरे यांचा आज ठाण्यातील रंगायतनमध्ये मेळावा पार पडला. त्यापूर्वी या सभास्थळी मनसैनिक घुसले. सभास्थळी मनसैनिकांनी अक्षरश: धुडगूस घातला. त्यावेळी पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड सुरु केली. मनसे कार्यकर्त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर फुगे मारले. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. मनसेच्या वतीने बांगड्या टाकून उद्धव ठाकरे यांचा निषेध करण्यात आला.

शिवसेनेला आव्हान देणारा पैदा झालेला नाही
ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. शिवसेनेला आव्हान करणारा अजून पैदा झाला नाही, हिंमत असेल तर समोर या, असे म्हटले. लोकसभेत पराभव झाला असला तरी विधानसभेत भगवा फडवल्याशिवाय राहणार नाही, असेही विचारे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages