जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे, पवारांचे राजकारण - राज ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS | Advertise With Us
आपल्या व्यवसायाची, ब्रँडची किंवा संस्थेची जाहिरात महाराष्ट्रातील डिजिटल वाचकांपर्यंत पोहोचवा. डिजिटल जाहिराती आणि व्यावसायिक सहकार्यासाठी संपर्क साधा.
Website Banner Ads Sponsored Content Business Promotions Digital Campaigns
JPN NEWS | Fast • Trusted • People's Voice
Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News

10 August 2024

जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे, पवारांचे राजकारण - राज ठाकरे


छत्रपती संभाजीनगर - जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे विधानसभेत मतं मिळवण्यासाठी राजकारण करत आहेत. राजकीय नेत्यांनी माझ्या नादी लागू नये, माझं मोहोळ उठलं तर यांना निवडणुकांमध्येही सभाही घेता येणार नाहीत असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. ते छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. (Uddhav Thackeray, Pawar's politics behind Jarange)

माझा महाराष्ट्र दौरा सुरू झाला तेव्हा मी मनोज जरांगे पाटील यांच नावही घेतलं नव्हतं. मात्र मुद्दाम माझ्याकडे काही माणसं पाठवून घोषणा देण्यात आल्या. घोषणाबाजी करणा-या या लोकांचे शरद पवार यांच्यासोबत फोटो आहेत. काल बीडमध्ये घडलेल्या प्रकारात तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जिल्हाप्रमुखच सहभागी होता. जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे विधानसभेत मतं मिळवण्यासाठी राजकारण करत आहेत, असे ठाकरे म्हणाले.

तुम्हाला जे करायचं ते करा, पण माझ्या नादी लागू नका. नाहीतर माझी पोरं काय करतील हे तुम्हाला समजणारही नाही. या राजकीय नेत्यांनी माझ्या नादी लागू नये, माझं मोहोळ उठलं तर यांना निवडणुकांमध्येही सभाही घेता येणार नाहीत. कारण त्यांच्याकडे प्रस्थापित असतील तर माझ्याकडे विस्थापित आहेत, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या राजकारणावर हल्लाबोल करताना राज ठाकरे पुढे म्हणाले की, तुमचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर राग असेल तर तुम्ही त्यांच्यावर टीका करा. पण त्यासाठी समाजात कशाला भांडण लावत आहात? शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता महाराष्ट्राचा मणिपूर होईल, असं म्हणतो. याचा अर्थ मतांसाठी या लोकांकडून जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला.

मराठवाड्यात जे जातीचं राजकारण सुरू आहे त्यामध्ये काही पत्रकारांचाही समावेश आहे. धाराशिवमध्ये जेव्हा माझ्याकडे येऊन काही लोकांनी घोषणा दिल्या तेव्हा त्यांना उसकवणारे काही पत्रकारच होते. कोणत्या पत्रकाराला कुठे कंत्राट मिळालं आहे, कोणाला एमआयडीसीची जागा मिळाली आहे, ही सगळी माहिती माझ्याकडे आली आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केला.

No comments:

Post a Comment

Live Updates

Breaking & Latest News Feed

Subscribe to JPN NEWS RSS feed for instant Mumbai & Maharashtra news alerts.

Subscribe Latest News
📢 तुमच्या परिसरातील बातमी पाठवा!

तुमच्या भागातील समस्या, घटना किंवा महत्त्वाच्या बातम्यांचे फोटो आणि व्हिडिओ थेट JPN NEWS ला पाठवा.

WhatsApp वर बातमी पाठवा (+91 9969191363)

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS