केरळ - Airtel युजर्सना त्यांचा रिचार्ज संपल्यानंतर देखील मोफत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा वापर करता येणार आहे. कंपनीचा हा नवा प्लॅन Airtel युजर्ससाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. ही ऑफर केरळमधील Airtel युजर्ससाठी सुरु करण्यात आली आहे. केरळमध्ये झालेल्या भूस्खलनाचा गांभीर्याने विचार करता कंपनीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसामुळे वायनाडमध्ये भूस्खलन झाले. याच भूस्खलनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. 100 पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती दिली जात आहे. या सर्व बाधितांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. केरळमधील वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर झालेल्या भीषण भूस्खलनाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ढिगाऱ्याखाली शेकडो लोक अडकले असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थीतीत केरळमधील Airtel युजर्सना कंपनीने दिलासा दिला आहे.
कंपनीने सांगितलं आहे की, केरळच्या वायनाड जिल्ह्यात राहणाऱ्या Airtel युजर्ससाठी रिचार्ज प्लॅन्सबाबत कंपनीने दिलासा दिला आहे. केरळ वायनाडमध्ये राहणारे Airtel युजर्स ज्यांच्या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीट संपली आहे आणि वायनाडमधील आपत्तीमुळे ते त्यांचे फोन रिचार्ज करू शकत नाहीत, त्यांना रिचार्जची काळजी करण्याची गरज नाही. या युजर्सना दिलासा म्हणून, कंपनी 1 GB मोफत मोबाइल डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS ची सुविधा देत आहे. Airtel युजर्ससाठी ही ऑफर 3 दिवसांसाठी व्हॅलिड असेल.
प्रीपेड युजर्ससोबतच कंपनीने पोस्टपेड युजर्सना देखील मोठा दिलासा दिला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सर्व पोस्टपेड ग्राहकांसाठी बिल भरण्याची तारीख 30 दिवसांनी वाढवण्यात आली आहे. ज्यामुळे केरळमध्ये राहणारे लोक दुर्घटनेच्या काळातही मोबाइल सेवा वापरणे सुरू ठेवू शकतील. Airtel ने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय प्रीपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे. कारण केरळमधील आपत्तीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वायनाड जिल्ह्यात झालेल्या भीषण भूस्खलनात 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 200 हून अधिक लोकं जखमी झाले. तर बेपत्ता 180 लोकांसाठी बचावकार्य सुरू आहे.
No comments:
Post a Comment