मुंबई - मुंबईतल्या एका शाळेत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात झुरळ आढळून आलं आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पोषक आहार उपलब्ध व्हावा, यासाठी सुरू केलेल्या माध्यान्ह भोजनातच झुरळ सापडल्याने घाटकोपरच्या केव्हीके घाटकोपर सार्वजनिक शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ होत असल्याची भावना पालकांमधून व्यक्त होत आहे.
घाटकोपर पश्चिमेला इंदिरा नगर येथे असलेल्या येथील केव्हीके घाटकोपर सार्वजनिक शाळा आणि ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात मंगळवारी भातात झुरळ सापडले. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी शाळा शिक्षकांकडे तक्रार केली. शाळा शिक्षकांनीही तातडीने ही बाब शाळा प्रशासनाच्या निदर्शनास आणली.
अन्न परीक्षण करण्यात यावे -
२०२२ पर्यंत या शाळेत इस्कॉनकडून माध्याह्न भोजन पुरवले जात होते. मात्र त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिकांनी हे कंत्राट बचत गटाला दिले आहे. मुलांना दिले जाणारे अन्न सुरुवातीला चवीसाठी शिक्षकांना देण्याची पद्धतही बंद करण्यात आली. तसेच पालिकेकडून अन्न परीक्षण करण्यात यावे, अशा सूचना असूनही ते केले जात नाही.
सखोल चौकशीचे आदेश -
या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून त्यानंतरच कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून त्यानंतरच कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
मध्यान्ह भोजन योजना -
मध्यान्ह भोजन योजना ही भारत सरकारची योजना असून शालेय विद्यार्थ्यांना शाळेत पौष्टिक आहार दिला जातो. विद्यार्थ्यांचं आरोग्य सुदृढ राहावं आणि कुपोषणापासून रक्षण व्हावं हा या योजनेचा उद्देश आहे. तसंच तळागळातल्या गरीब विद्यार्थ्यांनीही शाळेत हजेरी लावावी यासाठी प्रोत्साहनपर हा उपक्रम आहे. या योजनेंतर्गत दुपारच्या वेळेत शाळेत विद्यार्थ्यांना खिचडी हा पोषण आहार दिला जातो. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्षातील २०० दिवस दररोज ८ ग्रॅम प्रोटीन आणि ३०० कॅलरी ऊर्जेचा समावेश असेल असं जेवण दिलं जातं. सन २००१ मध्ये सुप्रीम कोर्टानं राज्य सरकार आणि केंद्र सरकारला ही योजना लागू करण्याचे आदेश दिले होते. तामिळनाडूनं ही योजना सर्वात आधी लागू केली होती.
No comments:
Post a Comment