सिंधुदुर्ग एमआयडीसीमध्ये येणार फार्मा उद्योजक, कोकणवासीयांना मिळणार रोजगार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2024

सिंधुदुर्ग एमआयडीसीमध्ये येणार फार्मा उद्योजक, कोकणवासीयांना मिळणार रोजगार


मुंबई - सिंधुदुर्गात एमआयडीसी उभी करून गावकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, हा मुख्य उद्देश आहे. तसेच कोकणाचा विकास व्हावा, या दृष्टीने पावले उचलली जात आहे. सरकारने या प्रकल्पासाठी ११,००० एकर जमीन राखून ठेवली आहे आणि हा प्रकल्प एमआयडीसी अंतर्गत असेल. जिल्हा सिंधुदुर्ग (ता. दोडामार्ग) येथील आडाळी येथे औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या रामटेक या शासकीय निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यासह देशभरातील औषध निर्माण व वैद्यकीय यंत्रसामग्री उत्पादक हजर होते. 

उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, कोकणामध्ये इंडस्ट्री येत असताना आमचे काही लोक त्याला विरोध करतात. पण आता ही मानसिकता बदलली आहे. दीपक केसरकर यांनी जो आता पुढाकार घेतला आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. मेडिकल डिवाइस तयार करण्यासाठी आपल्याला कोणतीही मदत लागणार असेल, तर ती आपण देऊ. फार्मामधील जेवढे लोक कोकणाकडे येतील त्यांचे आम्ही स्वागत नक्कीच करू. 

सिंधुदुर्ग जिल्हा हा नैसर्गिकदृष्ट्या आणि सागरी समुद्राने संपन्न असा आहे. आरोग्यदायी वातावरण, शून्य प्रदूषण आणि सहकार्य करणारी लोक आहेत. तसेच गोवा राज्य जवळ असणे हे औद्योगिक उद्योगासाठी महत्त्वाचे आहे. माझ्या कोकणातील लोकांना रोजगार उपलब्ध झाला तर त्याचे शहरातले व इतर राज्यातील स्थलांतर कमी होईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

जिल्ह्यात रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि विमान सेवा उपलब्ध आहे. तसेच वीज व पाणी सुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. नैसर्गिक दृष्ट्या संपन्न अशी जागा आहे. त्या ठिकाणची जागा ही उंच व सखल स्वरूपात आहे. ती जागा सरळ करून देण्याचे काम एमआयडीसीचे आहे. उद्योजकांना सगळ्या सुखसोयी एमआयडीसीकडून पुरविल्या जातील, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू यांनी दिली. याप्रसंगी एमआयडीसीचे अधिकारी, मोठमोठ्या फार्मा कंपनीच्या मालक व उद्योजक आदींची उपस्थिती होती. 

कोकणाचा विकास नक्कीच होणार! -
सिंधुदुर्ग हा जिल्हा अतिशय सुंदर आहे. आपण जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र स्थापन केले असून आता फार्मा क्षेत्रातील गुंतवणूकदार हे देखील जोडले गेले आहेत. त्यामुळे कोकणाचा विकास हा नक्कीच होणार आहे.
- ॲड. सुशीबेन शाह, शिवसेना प्रवक्त्या

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad