एसटीच्या अध्यक्षांनी शिवनेरी सुंदरीची भुरळ सोडून कर्मचारी व प्रवाशांच्या समस्सेकडे लक्ष द्यावे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2024

एसटीच्या अध्यक्षांनी शिवनेरी सुंदरीची भुरळ सोडून कर्मचारी व प्रवाशांच्या समस्सेकडे लक्ष द्यावे


मुंबई - एसटीचे कर्मचारी हे ब्रँड ॲम्बेसेडर व सुंदरी पेक्षा चांगली सेवा प्रवाशांना देत असून शिवनेरी सुंदरीची भुरळ सोडून नवीन अध्यक्षांनी एसटी कर्मचारी व प्रवाशांच्या समंस्स्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

काल महामंडळाच्या संचालक मंडळाच्या ३०४ व्या सभेत महामंडळाचे नवीन अध्यक्ष भरत गोगावले यांनी शिवनेरी सुंदरीची नेमणूक करण्याची घोषणा केली असून ती  परिस्थितीला अनुसरून नाही.आजही कर्मचारी व प्रवाशांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.व ते केल्यास उत्पन्न वाढ होऊन प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा देता येतील.

शिवनेरी बाबतीत बोलायचे झाल्यास ही सेवा महामंडळातील अत्यंत चांगली व फायदेशीर सेवा असून साधारण १२० इलेक्ट्रिक व डिझेल वरील बस या सेवेत आहेत.एसटीच्या वेगवेगळ्या सेवांच्या तुलनेत या सेवेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून या सेवेचे सरासरी भारमान हे ८०% इतके आहे..या सेवेत अजून गाड्या वाढविण्याची गरज असून त्याची व्याप्ती निव्वळ पुणे, मुंबई, ठाणे, या पुरती मर्यादित ठेवता राज्यभर वाढवली पाहिजे.आजही मागणीच्या तुलनेत सर्वच सेवेतील गाड्या कमी पडत असून त्यात प्रवाशांना अजून सेवा सुविधा दिल्या पाहिजेत.

एसटी कर्मचारी व अधिकारी अत्यंत हे चांगले काम करीत असून जुन्या झालेल्या गाड्या घेऊन त्यांनी महामंडळ नफ्याच्या जवळ पोहोचविले आहे. ब्रँड ॲम्बेसेडर व शिवनेरी सुंदरीवर खर्च करण्यापेक्षा वाढीव वेतनाचा फरक, महागाई भत्त्याची थकबाकी व वार्षिक वेतनवाढ प्रलंबित थकबाकी द्यावी. त्या मुळे कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्य  वाढून उत्पन्न वाढेल व ते ब्रँड ॲम्बेसेडर व शिवनेरी सुंदरी पेक्षा प्रवाशांना चांगल्या प्रकारे सेवा देतील यात शंका नाही असेही बरगे यांनी म्हंटले आहे.

विमान सेवा ही सलग सेवा असून तिला शक्यतो थांबे नसतात. त्या मुळे त्यांना खान पान देण्यासाठी हवाई सुंदरीची गरज असते.एसटीची कुठलीही सेवा ही थांब्याशिवाय नसून शिवनेरीच्या पुणे,मुंबई या सेवेत सुद्धा गाड्या चहा पाण्यासाठी थांबत असतात. त्या मुळे या गैरलागू  योजनेचा फेरविचार करावा अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad